व्हेज कोफ्ता पुलाव

veg-kofta-pulao-recipe-marathi

veg-kofta-pulao-recipe-marathi

व्हेज कोफ्ता पुलाव

साहित्य :

दोन वाट्या बासमती तांदूळ

फ्लॉवरचे तुरे पाऊण वाटी

मटार पाऊण वाटी

चिरलेला श्रावणघेवडा पाऊण वाटी

गाजर पाऊण वाटी

टोमॅटो पाऊण वाटी

एक वाटी उभा पातळ चिरलेला कांदा

एक चमचा आलं लसूण वाटण

फोडणीसाठी पाव वाटी तूप

दोन-तीन तमालपत्र

अर्धा चमचा शहाजिरं

थोडी लवंग

दालचिनी

मिरी

मीठ

चार-पाच वाट्या आधणाचे पाणी

थोडे काजू-बेदाणे

कोफ्त्यासाठी:

पाऊण वाटी पनीर

पाऊण वाटी उकडलेला बटाटा

पाव वाटी खवा

काजू-बेदाण्याचे बारीक तुकडे

एक ते दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर

मीठ

मिरपूड

एक चमचा बारीक चिरलेली आलं-लसूण-मिरची

तळण्यासाठी तूप

कृती:

तांदूळ धुऊन निथळावा. जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून काजू-बेदाणे, फ्लॉवर, घेवडा आणि गाजर तळून घेऊन बाजूला ठेवावे.

उरलेल्या तुपात अख्खा गरम मसाला फोडणीला घालून कांदा लालसर परतावा.

त्यावर आलं-लसूण वाटण, टोमॅटो, मटार आणि तांदूळ परतावे.

चवीनुसार मीठ आणि थोडं आधणाचं पाणी घालून तांदूळ अर्धाकच्चा शिजला की तळून घेतलेल्या भाज्या आणि काजू, बेदाणे मिसळावे.

जरुरीप्रमाणे पुन्हा मीठ आणि पाणी घालून पुलाव शिजू द्यावा.

कोफ्त्यासाठी दिलेलं सगळं साहित्य एकत्र करून, मळून त्यात जरुरीप्रमाणे कॉर्नफ्लोअर मिसळून त्याचे छोट्या गुलाबजाम एवढे गोळे करावे

ते गोळे तुपात मंद आचेवर तळून घ्यावे.

पुलाव करून घ्यावा आणि वाढताना त्यात कोफ्ते मिसळून वाढावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.