शेवयाची खीर

शेवयाची खीर

साहित्य :

अर्धा लिटर दूध

कुस्करलेल्या शेवया पाऊण वाटी

साखर पाऊण वाटी

पाच-सहा वेलदोडे

पाव जायफळ

दोन चमचे तूप

कृती :

दोन चमचे तुपावर शेवया तांबूस होईपर्यंत परतून, त्यात थोडे पाणी घालावे.

एक उकळी आल्यावर गाळण्यावर घालून पाणी काढून टाकावे.

असे पाणी काढून टाकल्यामुळे शेवया जुन्या असल्यामुळे येणारा वास व त्यातील मिठाचा असलेला अंश निघून जातो.

शेवया नंतर पातेल्यात घालून, त्यांत साखर घालून थोडेसे शिजवावे.

मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात दूध, वेलची व जायफळ उगाळून किंवा किसून घालावे व उकळी आणावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.