सांबार

sambar-recipe-marathi

sambar-recipe-marathi

सांबार

साहित्य :

एक वाटी तुरीची डाळ

पाव किलो कोहाळा

चार सुक्या मिरच्या

एक चमचा उडीद-डाळ

एक चमचा चण्याची डाळ

एक चमचा जिरे

एक चमचा धने

दोन-तीन लवंगा

दोन तीन मिरे

दालचिनीचा तुकडा

अर्धी वाटी खोवलेले खोबरे

चार ओल्या मिरच्या

कोथिंबीर

कढीलिंब

चिंच

मीठ

लाल तिखट

मेथ्या सात-आठ

फोडणीचे साहित्य

कृती :

प्रथम तुरीची डाळ शिजत टाकावी.

अर्धवट शिजल्यावर कोहाळ्याच्या फोडी करून त्यात घालाव्या व डाळ पूर्ण शिजवावी.

मेथी तेलावर बदामी रंगावर परतून घ्यावी. उरलेल्या त्याच तेलात उडीद-डाळ, चण्याची डाळ, जिरे, धने, दोन सुक्या मिरच्या, लवंगा, दालचिनी व मिरे हे सर्व खमंग भाजून घेऊन, त्यात मेथी घालून, सर्व जिन्नस एकत्र वाटावेत.

ओल्या मिरच्या व ओले खोबरे निराळे वाटावे. वाटलेले हे सर्व साहित्य डाळ शिजल्यावर त्यात घालावे.

आवडीप्रमाणे चिंच व मीठ घालावे. नंतर तेलाची खमंग फोडणी करून त्यात उरलेल्या दोन सुक्या मिरच्या व कढीलिंब टाकावा व ती फोडणी सांबाराला देऊन सांबार खूप उकळावे.

हे सांबार आपल्या आवडीप्रमाणे घट्ट अथवा पातळ करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.