पिठले

pithle-recipe-marathi

pithle-recipe-marathi

पिठले

साहित्य :

अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ

एक कांदा

चार हिरव्या मिरच्या

जिरे

मीठ

कोथिंबीर

फोडणीचे साहित्य

कृती : तेलाची खमंग फोडणी करून, त्यात मिरच्यांचे तुकडे आणि चिरलेला कांदा घाला.

नंतर त्यात चार वाट्या पाणी घालून मीठ टाकावे.

जिरे कुटून घालावे. पाण्याला उकळी आल्यावर थोडे-थोडे चण्याचे पीठ पसरून घालत-घालत पळीने ढवळावे, म्हणजे गोळी होणार नाही.

पिठले शिजल्यावर कोथिंबीर घालावी.

पिठले पातळ अगर घट्ट ज्या मानाने पाहिजे असेल, त्या मानाने पाणी अगर पीठ कमी-जास्त करावे.

आवडत असेल, तर एखादे अमसूलही पिठल्यात घालावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.