खिमा कलेजी

khima-kaleji-recipe-marathi

khima-kaleji-recipe-marathi

खिमा कलेजी

साहित्य :

खिमा एक किलो,

कलेजी पाव किलो

कांदे आठ-दहा मध्यम आकाराचे किसून

टोमॅटो चार-पाच मध्यम आकाराचे किसून

हिरव्या मिरच्या दोन

दालचिनीचा लहान तुकडा

दही अर्धी वाटी

मीठ

आलं लसूण वाटण तीन चमचे

तिखट एक चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

अंडी दोन उकडून

चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी

तेल अर्धी वाटी

जिरे एक चमचा

हिंग चिमूटभर

कृती:

प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हिंग- जिरे घालावं.

कांदा घालून तांबूस लाल होईपर्यंत परतावं.

आलं-लसूण वाटण घालून आणखी दोन मिनिटं परतावं

मग टोमॅटो घालून पुन्हा चार पाच मिनिटं परतावं.

तिखट, गरम मसाला आणि अर्धी वाटी दही व अर्धी वाटी पाणी घालावं.

हा मसाला प्रेशर ठेवून शिजवावा. एक शिट्टी झाली की बंद करावा. मग कुकर उघडून खिमा व कलेजीचे तुकडे घालून पाच मिनिटं परतावं.

मीठ घालून नीट मिसळून पुन्हा प्रेशर आणून एक शिट्टी होऊ द्यावी.

कुकर थंड झाला, की उघडून रस जास्त असेल तर घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवावं.

वाढायच्या भांड्यात काढून वर कोथिंबीर आणि एक अंडं किसून व एकाच्या चकत्या पसराव्या.

1 Comment

  1. एकदम छान माहिती आहे.वाचन करतानाच प्रत्यक्ष चव आणि अस्वाद घेतल्याचा अभास होतो…

Leave a Reply

Your email address will not be published.