काश्मिरी गोश्त बिर्याणी

kashmiri gosht biryani recipe marathi

kashmiri gosht biryani recipe marathi

काश्मिरी गोश्त बिर्याणी

साहित्य :

तीन वाट्या तांदूळ

पाऊण किलो कोवळं मटण

पंधरा- वीस लसूण पाकळ्या

दीड इंच आलं

एक चमचा तिखट

एक वाटी भिजत घालून कुस्करलेले जर्दाळू

एक वाटी दही

मीठ

अर्धी वाटी बदामाचे काप

बेदाणे

एक वाटी कुरकुरीत तळलेला कांदा

एक चमचा बडीशेपेची पूड

एक चमचा गरम मसाला

एक चमचा सुठपूड

हिगाच पाणी अर्धी वाटी

एक वाटी लांबट चिरलेला कांदा

एक वाटी तूप

पाव चमचा केशर भिजवून

चार उकडलेली अंडी

फोडणीसाठी :

चार बडी वेलची

दहा लवंगा

तमालपत्रं

कृती:

मटण धुऊन निथळावं. आलं-लसूण वाटून ते, तिखट, मीठ, जर्दाळू दह्यात कालवून मटणाला लावून दोन-तीन तास मुरवावं.

तांदूळ धुऊन, निथळून, पाव वाटी तुपात फोडणीसाठी दिलेला अख्खा मसाला घालून नेहमीच्या पद्धतीनं मोकळा सळसळीत भात शिजवावा.

जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून बदामाचे काप, बेदाणे तळून घ्यावे.

उरलेल्या तुपात लांबट चिरलेला कांदा परतून त्यावर बडीशेप, सुंठपूड, गरम मसाला, मुरलेलं मटण परतावं.

हिंगाचं पाणी घालून एक वाफ येऊ द्यावी. मटण अर्धवट शिजल्यावर त्यावर भात, तळलेला कांदा, बेदाणे यांचा थर द्यावा.

सगळ्यात वर केशर शिंपडून कणकेनं झाकण बंद करावं आणि बिर्याणी शिजवावी.

वाढताना उकडलेल्या अंड्यांच्या चकत्यांनी सजवून वाढावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.