काला चना

kala-chana-recipe-marathi

kala-chana-recipe-marathi

काला चना

साहित्य :

काळे हरभरे पाव किलो

कांदे चार मोठे

टोमॅटो तीन

आलं-लसूण वाटण तीन चमचे

मीठ, तिखट एक चमचा

हिरव्या मिरच्या चार वाटून

धनेपूड एक चमचा

चिरलेली कोथिंबीर एक वाटी

साय दोन-तीन चमचे

हळद अर्धा चमचा

कृती :

हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत.

कांदा-टोमॅटो चिरून वाटून घ्यावेत.

कुकरमध्ये तेल गरम करून त्यावर आलं-लसूण वाटण, वाटलेली हिरवी मिरची परतावी.

त्यावर कांदा-टोमॅटो वाटण परतावं.

धनेपूड, तिखट, हळद, मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावं.

साय घालून ढवळावं. हरभरे घालून दहा मिनिटं परतावं.

पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.