कढी

kadhi-recipe-marathi

kadhi-recipe-marathi

कढी

साहित्य :

चार वाट्या गोड ताक

दोन हिरव्या मिरच्या

आले

दोन चमचे तूप

अर्धा चमचा जिरे

पाव चमचा हिंगाची पूड

पाव चमचा हळद

मीठ

कढीपत्ता

कोथिंबीर

कृती :

हिंग, जिरे व हळद घालून तुपाची फोडणी करावी.

त्यात कढीपत्ता घालावा व ती फोडणी ताकाला द्यावी.

नंतर त्यात मिरच्या व आले (दोन्ही वाटून) आणि चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी व कढीला उकळी आणावी.

उकळी आल्यावर थोडे चण्याचे पीठ पाण्यात कालवून लावावे.

मात्र ताक ताजे असल्यास कढी उकळण्यास ठेवण्यापूर्वी चण्याचे पीठ ताकाला लावून घ्यावे व नंतर उकळी येईपर्यंत ढवळत राहावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.