घडीची पोळी

ghadichi-poli-recipe-marathi

ghadichi-poli-recipe-marathi

घडीची पोळी

साहित्य :

कणिक

तेल

मीठ

तांदळाची पिठी

कृती :

कणकेत तेल व मीठ घालून व पुरेसे पाणी घालून, कणीक साधारण सैलसर भिजवावी व चांगली मळून घ्यावी, नंतर तिचे लहान लहान गोळे करावेत.

त्यांतील गोळा घेऊन, तो पोळपाटावर तांदळाची पिठी किंवा कणीक पसरून त्यावर पूरीएवढा लाटावा

व त्याला तेल लावून अर्धी दुमडून घडी घालावी, पुन्हा ती लांबीच्या बाजून दुमडून, त्याचा त्रिकोण होईल

अशी घडी  घालावी व पुन्हा पिठी लावून, हलक्या हाताने मोठी पोळी लाटावी

नंतर तव्यावर टाकून खरपूस भाजावी.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.