आप्पे

आप्पे

साहित्य :-

१) तांदूळ एक वाटी

२) उडीदडाळ अर्धी वाटी

३) चणा डाळ पाव वाटी

४) चार ते पाच मिरच्या

५) १ वाटी कांदा बारीक चिरलेला

६) सहा लसणाच्या पाकळ्या

७) चवीनुसार मीठ , मुठभर पोहे

८) आले अर्धा इंच व तेल .

कृती :-

१) प्रथम दोन्ही डाळी व तांदूळ वेगवेगळे भिजत टाकावेत . दहा तासांनी ते भिजवलेले तांदूळ व डाळी मिक्सरमधुन बारीक करून घ्याव्यात .

२) बारीक करताना मिरची , आले , लसूण व पोहे टाकून वाटाव्यात . वाटून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा , मीठ टाकावे .

३) पीठ जास्त पातळ करू नये . आप्पे पात्र गैसवरती तापवत ठेवावेत . त्याच्या प्रत्येक गोलात चमच्याने थोडे-थोडे तेल सोडावेत व तयार केलेले मिश्रण चमच्याने थोडे थोडे त्यामध्ये टाकावे . गैस मंद करून झाकण ठेवावे.

४) दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून चमच्याने आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजावेत व खोबऱ्याच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.