साबुदाणा वडा

साबुदाणा वडा

साहित्य

• १ कप साबुदाणे
• २ मोठे बटाटे उकडून
• ५-६ तिखट हिरव्या मिरच्या
• १/४ कप चिरलेली कोथिंबीर
• १/२ टिस्पून जीरे
• १/४ ते १/२ कप शेंगदाण्याचा कूट
• १/२ लिंबाचा रस
• चवीपुरते मीठ
• वडे तळण्यासाठी तेल

कृती

• साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत.

• शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.

• मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.

• शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत.

• भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.

• भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

• खवलेला नारळ, मिरची, आणि कोथिम्बीरच्या चटणीबरोबर वडे छान लागतात.

उपवास नसेल तरीही खाऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.