साधे ऑम्लेट

साधे ऑम्लेट

साहित्य

• २ अंडी
• २ मोठे चमचे दूध
• चिमूटभर मीठ
• मिरपूड
• २ चमचे बटर

कृती

• अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात मीठ, मिरपूड व दूध घालून पुन्हा चांगले फेटा.

• तव्यावर मध्यम आचेवर बटर गरम करा.

• बटर वितळू लागले की त्यात हे मिश्रण घालून अंडे सेट होईपर्यंत १-२ मिनीटे शिजवा.

• नंतर आणखी शिजवून अलगद सर्व्हिंग डिशमध्ये काढा.

• सोबत सलाडही सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.