वेज पनीर माखनवाला

वेज पनीर माखनवाला

साहित्य

• १/२ कप पनीरचे तुकडे
• १/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच)
• १/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे)
• १/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे)
• १/४ कप फ्लॉवरचे तुकडे
• १/२ कप कांदा (छोटे तुकडे)
• ३ टेस्पून मटार
• १ कप टोमॅटोचे तुकडे (सोललेला)
• १ टेस्पून टोमॅटो पेस्ट
• १/२ टेस्पून जिरे
• १/२ टेस्पून लाल तिखट
• १/२ टिस्पून गरम मसाला
• १ तमालपत्र
• दिड टेस्पून दुध
• दिड टेस्पून बटर
• २ टेस्पून तूप
• चवीपुरते मिठ

कृती

२ कप पाण्यात फरसबीचे तुकडे, गाजर, बटाटा, फ्लॉवरचे तुकडे आणि मटार उकळवत ठेवावे. या पाण्यात १ तमालपत्र घालावे. भाज्या निट शिजू द्याव्यात. भाज्या शिजल्या कि उरलेले पाणी ठेवून द्यावे. तमालपत्र काढून टाकावे.

• २ टोमॅटो पाण्यात साल सुटेस्तोवर उकळवावे. साले काढून टोमॅटोचे बारीक तुकडे करावे.

• नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घालावे व कांदा परतावा. कांदा परतला कि १/२ टिस्पून गरम मसाला घालावा. कांदा निट शिजू द्यावा.

• नंतर टोमॅटोचे तुकडे घालावे. तूपाचा तवंग येईस्तोवर शिजू द्यावे.

• नंतर उकळलेल्या भाज्या घालाव्यात, भाज्या उकळून उरलेले पाणी, टोमॅटोपेस्ट घालावी, मिठ आणि तिखट घालावे. ढवळावे.

• गॅस मंद करून दुध, बटर, पनीर घालून हळूवार ढवळावे.४ ते ५ मिनीटे मंद आचेवरच झाकून शिजू द्यावे.

गरमा-गरम भाजी नान, रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.