वांगीभात

वांगीभात

साहित्य

• १ कप तांदूळ (बासमती किंवा तुकडा बासमती चालेल)
• ७-८ लहान वांगी (साधारण १/४ किलो), मोठ्या फोडी कराव्यात
• फोडणीसाठी:- २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, ७-८ पानं कढीपत्ता
• १ टेस्पून वांगीभात मसाला
• चवीपुरते मीठ
• वांगी तळण्यासाठी तेल
• १ तमालपत्र आणि १-२ वेलची

कृती

तांदूळ पाण्यात १५-२० मिनिटे भिजत घालावा. पाणी काढून टाकावे. भात मोकळा आणि जरा फडफडीत शिजवावा. शिजवताना त्यात मीठ, तमालपत्र आणि वेलची घालावी. भात शिजल्यावर तमालपत्र आणि वेलची काढून टाकावी.

• कढईत तेल गरम करून त्यात वांगी तळून घ्यावी. (खाली टीप पहा)

• मोठ्या जाड बुडाच्या कढईत २-३ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात तळलेली वांगी, थोडे मीठ आणि वांगीभात मसाला घालावा. लगेच भात घालून मिक्स करावे.

• जर कोरडे कोरडे वाटले तर थोडेसे तूप घालावे. चव पाहून लागल्यास मसाला किंवा मीठ घालावे.

मंद आचेवर मिक्स करावे.

• कढईवर जड झाकण ठेवून वाफ काढावी. तळाला भात चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.

भात गरमच सर्व्ह करावा.

टीप:

१) तळण्यासाठी तेल कमीच घ्यावे आणि वांगी ३-४ बॅचमध्ये तळावी. जे उरलेले तेल असेल तेच फोडणीसाठी वापरावे म्हणजे तळणीचे पुढे काय करावे हा प्रश्न उरत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.