रताळे कचोरी

रताळे कचोरी

साहित्य

• १ कप उकडून कुस्करलेले रताळे
• ३ ते ४ टेस्पून शिंगाडा पीठ
• चवीपुरते मीठ
• तळणीसाठी तेल

सारण:

• १ कप ताजा खोवलेला नारळ
• ३-४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या
• २ चमचे कोथिंबीर, बारीक चिरून
• १५-२० बेदाणे
• १/२ टीस्पून जिरे
• १ टीस्पून तूप
• चवीपुरते मीठ
• १/२ चमचा साखर (ऐच्छिक)

कृती

• रताळे उकडून सोलावे. जर त्यात दोरेदोरे असतील तर चाळणीतून गाळून घ्यावे.

• उकडलेले रताळे बोलमध्ये घेउन कुस्करावे. मीठ आणि शिंगाड्याचे पीठ घालावे. मऊसर गोळा बनवावा. १५ मिनिटे झाकून ठेवावा.

• या १५ मिनिटात सारण बनवावे. कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, बेदाणे आणि नारळ घालावा. मीठ आणि थोडीशी साखरही घालावी. नीट परतून कोरडे सारण बनवावे.

• मळलेल्या पीठाचे १ इंचाचे गोळे बनवावे. लाटून छोटी पुरी बनवावी. आत १ चमचा सारण घालून कडा जुळवून कचोरी बांधावी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवाव्यात.

• कचोऱ्या मध्यम आचेवर तुपात किंवा शेंगदाणा तेलात तळाव्यात. झाऱ्याने कचोऱ्या हलवत ठेवाव्यात म्हणजे समान टाळल्या जातील. कचोऱ्या सोनेरी रंगावर तळून काढाव्यात.

• हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात. उपवास नसेल तरीही खाऊ शकता

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.