मूगाचा डोसा

मूगाचा डोसा

साहित्य

• २ वाट्या सालीची मुगडाळ
• १ वाटी उडीदडाळ (सालीसहीत असेल तर चांगले)
• ४-५ हिरव्या मिरच्या
• १ छोटा तुकडा आले
• ३-४ टीस्पून मीठ (चवीप्रमाणे)
• बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर वरुन घालण्यासाठी (ऎच्छीक)

कृती

डाळी धुवुन कमीत कमी ५ ते ६ तास भिजवाव्यात. त्यानंतर त्यात मिरच्या, आले, मीठ घालुन नीट वाटुन घ्यावे.

• अगदी बारीकच झाले पाहीजे असे नाही. पण खुप जाडसर असु नये. वाटलेले पीठ साधारण ६-७ तास झाकुन ठेवावे.

• हवामानानुसार कमीजास्ती अंबते ते गरजेपुरते पुरेसे होते. करतेवेळी शक्यतो non stick तव्यावर करावे. साधारण २ डाव पीठ नीट पसरवुन घ्यावे खुप पातळ असु नये. वरुन कांदा कोथिंबीर पसरावी आणि झाकण घालावे.

• साधारण २ मिनीटानी उलटावे ती बाजु भाजुन झाली की नारळाच्या ओल्या चटणीबरोबर खायला द्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.