मुगाचे धिरडे

मुगाचे धिरडे मराठी रेसिपी

मुगाचे धिरडे मराठी रेसिपी

मुगाचे धिरडे

साहित्य :
हिरवे मूग ( २ तास भिजवलेले )
कांदा
कोथिंबीर
ओल्या मिरच्या
मीठ
तेल
कृती :
मूग दोन तास भिजत घालावेत.
नंतर मिरच्या व मूग एकत्र बारीक वाटावे.
वाटलेल्या मिश्रणात मीठ घालावे.
कांदा व कोथिंबीर चिरून ठेवावी.
तयार मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून तव्यावर धिरड्याइतपत जाड पसरावे.
धिरडे झाल्यावर तव्यावरच असताना धिरड्यावर चिरलेला कांदा व कोथिंबीर घालावी व डोशाप्रमाणे गुंडाळी करावी.
हिरव्या रंगामुळे हा धिरड्याचा प्रकार चांगला दिसतो
झटपट तयार होणारा हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे.
मुख्य टीप : मूग वाटून झाल्याबरोबर लगेचच धिरडे घालावे. त्यामुळे मुगाचा हिरवा रंग राहतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.