मलबारी मूर्गी

मलबारी मूर्गी

साहित्य

• १ किलो चिकन
• १० काजू
• ४ कांदे (बारीक चिरलेले)
• १० लसणाच्या पाकळ्या
• १ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
• स्वादानुरूप मीठ
• १ चमचा साखर
• अर्धा कप नारळाचं दूध
• १ चमचा लिंबाचा रस

मसाला :

• १० गोवा मिरच्या (गरम पाण्यात ठेवलेल्या)
• १ चमचा हळद

कृती

• काजूसकट सर्व गरम मसाला मिक्सरमधून वाटून घ्या.

• पातेल्यात तूप तापवून त्यात लसूण व कांदा तांबूस रंगावर परतवून घ्या.

• त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

• त्यात वाटलेला मसाला व चिकनचे तुकडे घालून परतवा. त्यात हळद घालून चांगले परतवा. गॅस मंद ठेवा.

• त्यात मीठ, साखर, नारळाचे दूध घाला व उकळी आल्यावर चिकन शिजत ठेवा.

• त्यात लिंबूरस एकत्र करून खाली उतरवा.

• चिकन शिजल्याची खात्री करून घ्या व मलबारी मूर्गी गरमागरम सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.