बिसिबेळे भात

बिसिबेळे भात

साहित्य

• ३/४ कप तांदूळ
• १/४ कप तूर डाळ
• १ टेस्पून चिंच
• दीड कप चिरलेल्या भाज्या, मध्यम चौकोनी (बटाटा, फरसबी, वांगं, गाजर, कॉलीफ्लॉवर)
• मसाले: १ इंच दालचिनीचा तुकडा, २ वेलच्या, २ तमालपत्र
• फोडणीसाठी: १ टेस्पून तूप, १/२ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, १४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
• १ टेस्पून सांबार मसाला (शक्यतो घरगुती)
• चवीपुरते मीठ
• स्पेशल तडका :-
• २ टेस्पून तूप
• १/४ टीस्पून हिंग
• २ ते ३ टेस्पून शेंगदाणे
• ७ ते८ कढीपत्ता पाने

कृती

• तूरडाळ धुवून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. (टीप १ पहा)

• चिंच १/४ कप गरम पाण्यात भिजत ठेवावी. १० मिनिटांनी चिंच कुस्करून कोळ वेगळा काढावा.

• नॉनस्टिक पातेल्यात १ टेस्पून तूप गरम करावे. त्यात दालचीनी, वेलची, तमालपत्र घालून ५-७ सेकंद परतावे. जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. या फोडणीत वांगे सोडून चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. झाकण ठेवून २ मिनिटे वाफ काढावी. आता तांदूळ आणि ३ कप पाणी घालावे. चिंच कोळ आणि सांबार मसाला घालावा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावे.

• आपल्याला एकदम मऊ आणि अगदी थोडा पातळसर भात शिजवायचा आहे त्यासाठी लागल्यास पाणी घालावे. भात ६०% शिजला कि शिजवलेली तूरडाळ आणि वांगी घालावी.

• १० मिनिटे झाकण ठेवून किंवा भात पूर्ण शिजेस्तोवर शिजवावे.

• भात ताटामध्ये वाढावा. लगेच कढल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. त्यात हिंग आणि शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे लालसर होईस्तोवर परतावे. शेंगदाणे लालसर झाले कि कढीपत्ता घालावा. हि फोडणी वाढलेल्या भातावर १-२ चमचाभर घालावी. हि फोडणी फार महत्त्वाची आहे आणि यामुळे भाताची चव अजून खुलते.

टीपा:

१) तूरडाळ शिजल्यावर प्रेशरकुकरमधून बाहेर काढावी. आमटीसाठी जशी रवीने डाळ मोडतो तशी डाळ रवीने घुसळू नये. अशीच वापरावी. घुसळलेली डाळ भातात घातल्यावर भाताचे टेक्स्चर बदलते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.