बटाटा पोहे

बटाटा पोहे

साहित्य

• २ कप पोहे
• १ बटाटा
• २ कांदे
• ३ हिरव्या मिरच्या
• कोथिंबीर
• कढीपत्ता
• ४ चमचे मोठे किसलेले खोबरे
• १ लिंबू
• १ चमचा साखर
• पाव चमचा हिंग
• अर्धा चमचा मोहरी
• २ मोठे चमचे तेल
• पाव चमचा हळद
• मीठ

कृती

• पोहे निवडून धूवून घ्या. असे करण्यासाठी एका गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा.

• दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका.

• नंतर बटाटा व कांदा टाका. झाकून पाच मिनिटे शिजू द्या.

• बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा.

• आता हळद आणि पोहे टाका. तीन-चार मिनिट हलवा उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा.

• बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटार वापरल्यास छान लागतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.