तांदळाच्या पापड्या (फेण्या)

tandalachya-papdya-recipe-marathi

tandalachya-papdya-recipe-marathi

तांदळाच्या पापड्या (फेण्या)

साहित्य :

तांदूळ

मीठ

हिंग

खसखस

कृती :

तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजत घालावेत. नंतर उपसून ते कुटावेत व मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.

बासुंदीइतपत दाट होईल, त्या मानाने त्या पिठात पाणी घालावे व त्यात हिंग, मीठ व थोडी खसखस घालावी.

मिश्रण सारखे करावे फेण्या घालण्याचा साचा मिळतो, त्यावर तयार केलेले पीठ घालून व वाफवून फेण्या कराव्यात.

याप्रमाणे प्लॅस्टिकच्या कागदावर फेण्या घालाव्या. वाळल्यावर त्या काढाव्या.

टीप : याप्रमाणेच ज्वारी, बाजरी, मका, नाचणी यांच्याही फेण्या होतात. ही धान्ये पाच दिवस पाण्यात भिजत घालून, त्यांचे पीठ करून घ्यावे व वरीलप्रमाणेच पापड्या कराव्यात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.