ज्वारीचे धपाटे

ज्वारीचे धपाटे

साहित्य

• ३ वाट्या ज्वारी पीठ
• १ वाटी कांदा किसून
• १ टी स्पून लसूण
• १ टे. स्पू. प्रत्येकी दाणेकूट व तीळकूट
• १/२ वाटी कोथिंबीर
• तिखट
• मीठ
• तेल

कृती

• ज्वारीचे पीठ चाळून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र मळावे.

• पातळ भाकरीप्रमाणे थापावे. गॅसवर तवा गरम करत ठेवावा.

• तवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी..!

• दही किंवा चटणी सोबत खावीत.

• ही धपाटी ७-८ दिवस टिकतात, आणि ही प्रवासासाठी अधिक उपयुक्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.