अडई डोसा

अडई डोसा

साहित्य

• ३/४ कप तांदूळ
• १/२ कप उडीद डाळ
• १/४ कप चणाडाळ
• १/४ कप तूरडाळ
• १/४ कप मुग डाळ
• १/४ कप मसूर डाळ
• १२ ते १५ मेथी दाणे
• ४-५ सुक्या लाल मिरच्या
• १ इंच आले
• चवीपुरते मीठ
• डोसा बनवताना तेल

कृती

• तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मुगडाळ, मसूरडाळ, मेथीदाणे आणि लाल मिरच्या पुरेशा पाण्यात किमान ५-६ तास भिजत ठेवावे.

• त्यातील पाणी काढून दुसऱ्या एका भांड्यात काढून ठेवावे. डाळ-तांदुळाच्या मिश्रणात आलं आणि मीठ घालून बारीक वाटावे. वाटताना बाजूला काढलेले पाणी थोडेथोडे घालून नेहमीच्या डोशाच्या पिठाला करतो तेवढे दाट वाटावे.

• नॉनस्टीक तवा गरम करून त्यावर एक डाव पीठ घालावे. गोल पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू लालसर भाजली गेली कि दुसरी बाजू पलटावी.

• तयार डोसा सांबर, चटणी, आणि बटाट्याची भाजी यांबरोबर सर्व्ह करावा.

टीप:

१) या डोशाचे पीठ आंबवावे लागत नाही. मिक्सरमध्ये बारीक केले कि लगेच डोसे घालावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.