अंड्याची भूर्जी

अंड्याची भूर्जी

 

साहित्य

• ४ अंडी
• २ मोठा कांदा बारीक चिरून
• १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
• २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
• मूठभर चिरलेली कोथिंबीर
• २ चमचा तेल
• लाल तिखट अर्धा चमचा
• अर्धा चमचा जिरे
• चवीनुसार मीठ

कृती

• खोलगट फ्राईंगपॅन किंवा कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची परतून घ्यावी. कांदा गुलाबी झाला की टोमॅटो घालून परतावे.

• एका पातेल्यात अंडी हलकी फेटून घ्यावीत व परतलेला कांदा टोमॅटोवर घालावा. चवीनुसार मीठ व अर्धा चमचा लाल तिखट घालून ढवळावे. ढवळून अंडे पूर्ण कोरडे झाले की कोथिंबीर घालून उतरवावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.