
व्हेज टिक्की
साहित्य :
बटाटे सहा उकडून
मटार एक वाटी वाफवून
गाजर किसून एक वाटी
पनीर पन्नास ग्रॅम
मीठ
हिरव्या मिरच्या दोन
धनेपूड
जिरंपूड व कॉर्न फ्लोर प्रत्येकी एक चमचा
चाट मसाला अर्धा चमचा
ढोबळी मिरची बारीक चिरून अर्धी वाटी
कृती :
उकडलेला बटाटा, पनीर कुस्करून त्यात बाकी सर्व जिन्स घालून एकत्र मळून घ्यावं.
त्याचे आवडीनुसार आकाराचे लहान- लहान गोळे करावेत आणि सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
वरून चाट मसाला भुरभुरावा.
चटणी-सॉसबरोबर खायला द्यावेत.
Leave a Reply