
व्हेज पुलाव
साहित्य :
बासमती तांदूळ चार वाट्या
बारीक चिरलेलं गाजर एक वाटी
मटार एक वाटी
श्रावण घेवड्याचे बारीक तुकडे अर्धी वाटी
फ्लॉवरचे लहान तुकडे अर्धी वाटी
जिरे एक चमचा
काळी मिरी तीन चार
लवंगा तीन
दालचिनी अर्धा इंच
तमालपत्र एक
तेल अर्धी वाटी
मीठ
कृती:
तांदूळ धुऊन पंधरा मिनिटं पाणी घालून ठेवावे.
रूंद पसरट भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी, तमालपत्र घालावं.
एक-दोन मिनिटांनी सर्व भाज्या घालून चार-पाच मिनिटं परतावं.
मग तांदूळ व मीठ घालून आठ वाट्या पाणी घालावं व नीट मिसळून उकळी आली की झाकण ठेवावं व मंद आचेवर शिजू द्यावा.
पापड आणि दह्याबरोबर पुलाव गरम वाढावा.
Leave a Reply