
व्हेज हंडी
साहित्य :
- तीन वाट्या वाफवलेल्या भाज्या (फ्लॉवर, मटार, गाजर, फरसबी,सिमला मिरची,बटाटा इ.) ,
- दोन वाट्या पनीरचे अर्धा इंच आकाराचे तुकडे,दोन बारीक चिरलेले टॉमेटो, दोन बारीक चिरलेले कांदे
- एक वाटी काजू-टोमटोची ग्रेव्ही,दोन टेबलस्पून आलेलसूण पेस्ट एक चमचा धने पूड,एक चमचा गरम मसाला
- चवीनुसार अर्धा ते एक चमचा लाल तिखट,एक टेबलस्पून फ्रेश क्रीम,अर्धा डाव तेल,दोन चमचे बटर
- चवीनुसार मीठ.
कृती :
- प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात आलेलसणाची पेस्ट घालून एखादे मिनिट परतून घ्यावे व नंतर बारीक चिरलेला कांदा घालून लालसर रंगावर परतावा.कांदा छान परतला गेला कि टॉमेटो घालून मऊ होईस्तोवर परतावे.
- आता त्यात सगळ्या वाफवलेल्या भाज्या, काजू-टोमटोची ग्रेव्ही, फ्रेश क्रीम, बटर, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडे गरम पाणी घालावे.
- मंद आचेवर पांच मिनिटे शिजवावे.
तयार व्हेज हंडी भाजी सर्व्हिग बाऊलमध्ये काढून वरून थोडे क्रीम आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावी.
टिप : साध्या लाल मिरचीच्या तिखटाबरोबर छान लाल रंगासाठी १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट घालावे. (काश्मिरी लाल तिखटाला तिखटपणा कमी आणि रंग जास्त असतो.)
Leave a Reply