
वरई भात
साहित्य :
दोन वाट्या वरईचे तांदूळ
चार- पाच हिरव्या मिरच्या
मीठ चवीनुसार
थोडं साजूक तूप
दही एक वाटी
एक वाटी दूध
कृती :
वरई प्रथम काळजीपूर्वक निवडावी
नंतर धुऊन थोड्याशा तुपावर जरा परतून घ्यावी आणि आधणाचं पाणी दुप्पट प्रमाणात घालावं.
सारखं ढवळावं. मीठ, मिरच्यांचे तुकडे घालावे.
मऊ मोकळा आवडत असल्यास पाणी कमी घालावं.
वरईचा भात साजूक तूप घालून चांगला लागतो.
बरोबर नारळ शेंगदाण्याची चटणी द्यावी.
Leave a Reply