
उडद दाल फ्राय
साहित्य :
उडीद डाळ एक वाटी
बारीक चिरून एक मोठा कांदा
मीठ
किसलेलं आलं अर्धा चमचा
लसूण तीन-चार पाकळ्या
तिखट अर्धा चमचा
हळद पाव चमचा
जिरे एक चमचा
चिमूटभर हिंग
तूप तीन चमचे
कोथिंबीर
कृती:
डाळ स्वच्छ धुऊन पंधरा मिनिटं भिजत घालावी.
एक वाटी पाणी घालावं नंतर आलं मीठ व हळद घालावं.
कुकरमध्ये शिजायला ठेवावी आणि एक शिट्टी झाल्याबरोबर गॅस बंद करावा.
तूप गरम करून त्यात जिरं व हिंग घालावं, मग लसूण आणि चिरलेला कांदा घालून तांबूस रंग येईपर्यंत परतावं.
मग तिखट घालावं. शिजलेल्या डाळीवर वरून हा गरम तडका टाका.
वर कोथिंबीर घालून सजावट करावी.
Leave a Reply