
तुरीच्या दाण्यांची खिचडी
साहित्य :
तीन वाट्या तांदूळ
दीड ते दोन वाट्या ओले तुरीचे दाणे
अर्धा इंच आलं धुऊन बारीक चिरून
चार हिरव्या मिरच्या उभ्या कापून
दोन-तीन दालचिनीचे तुकडे
पाच-सहा लवंगा
दोन मसाला वेलची
तीन हिरवी वेलची
अर्धा चमचा जिरं
मीठ
हळद
अर्धी वाटी ओलं खोबरं
अर्धी वाटी धुऊन चिरलेली कोथिंबीर
एक लिंबू
फोडणीसाठी :
दोन मोठे चमचे तूप, तेल दोन मोठे चमचे,दोन लहान चमचे तूप.
कृती :
तांदूळ धुऊन अर्धा तास निथळत ठेवावे.
पातेल्यात तूप घालावं. त्यात सर्व अख्खा मसाला घालावा.
आल्याचे तुकडे आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या घालाव्यात.
त्यावर तांदूळ टाकून नीट चांगले परतून घ्यावेत.
तुरीचे दाणे घालावेत. मीठ, हळद घालून पुन्हा परतावेत.
उकळतं पाणी खिचडीत घालावं. खिचडी मंद आचेवर शिजवावी.
शिजून झाल्यावर साजूक तूप सोडावं. वाढताना खोबरं, कोथिंबीर, साजूक तूप घालावं.
खिचडीबरोबर कैरीचं लोणचं आणि पापड द्यावा.
Leave a Reply