
टोमॅटो सार
साहित्य :
अर्धा किलो पिकलेले लाल टोमॅटो
एक नारळ
दोन चमचे मीठ
अर्धी वाटी साखर किंवा चिरलेला गूळ
पाच-सहा हिरव्या मिरच्या
आल्याचा तुकडा एक इंच
लाल बीटचे तुकडे पाव वाटी
एक-दोन लसणीच्या पाकळ्या
कृती :
टोमॅटो शिजवावेत. टोमॅटो शिजतानाच त्यांत लाल बीटचे तुकडे घालावेत.
बीटमुळे साराला रंग चांगला येतो. नारळाचे दूध काढून घ्यावे.
शिजवलेले टोमॅटो गाळून घेऊन नारळाचे दूध घालावे.
हिरव्या मिरच्या, आले, जिरे व लसणीच्या पाकळ्या वाटून घेऊन तो गोळा त्यात घालावा.
तसेच मीठ, साखर अथवा गूळ व कोथिंबीर बारीक चिरून घालावी व सार चांगले उकळू द्यावे.
Leave a Reply