
तरकारी नि खिचडी ( गुजराती खिचडी )
साहित्य :
दोन वाट्या तांदूळ
एक वाटी तूर डाळ
एक बटाटा
एक काकडी
अर्धी वाटी मटार
दहा-बारा श्रावणघेवड्याच्या शेंगा
वाटीभर फ्लावर
कांदा उभा चिरून वाटीभर
एक वाटी घुसळलेलं दही
नारळाचं दूध तीन वाट्या
मीठ
पाव वाटी साजूक तूप
शहाजिरं
मसाल्यासाठी :
सात-आठ लवंगा, दोन इंच दालचिनी, एक इंच आलं, दहा-बारा लसूण पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या.
कृती:
डाळ एक तास पाण्यात भिजत घालावी. तांदूळ अर्धा तास भिजत घालावे.
सगळ्या भाज्या बारीक चिराव्या. आलं-लसूण आणि मिरच्याही बारीक चिराव्या.
पातेलीत तूप तापवून शहाजिरं, लवंग आणि दालचिनी फोडणीला टाकावी.
त्यावर आलं, लसूण, मिरच्यांचे तुकडे आणि कांदा परतावा.
खमंग वास सुटला की डाळ आणि तांदूळ परतून दही तसंच नारळाचं दूध घालावं.
जरुरीनुसार मीठ आणि लागल्यास थोडं गरम पाणी घालून खिचडी मऊ शिजवावी.
गरम गरम वाढावी.
Leave a Reply