
तांदळाची खीर
साहित्य :
एक लिटर दूध
बासमती तांदूळ अर्धी वाटी
बदामाचे काप अर्धी वाटी
साखर एक वाटी किंवा थोडी कमी
पाच वेलदोड्यांची पूड
कृती :
तांदूळ पाण्यात अर्धवट शिजवून घ्यावे.
जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवावं.
उकळी आली, की तांदूळ घालून मंद आचेवर शिजवत राहावं.
दूध आटून पाऊण झालं आणि भात शिजून मिश्रण एकजीव झाल्यासारखं दिसू लागलं की साखर घालावी,
आच मंदच ठेवून आणखी दहा मिनिटं शिजवावं व घट्ट होऊ द्यावं.
साखरेबरोबरच वेलदोडा पूडही घालावी.
वाढायच्या भांड्यात काढून वर बदामाचे काप घालावे.
सीझनप्रमाणे थंड किंवा गरम खायला द्यावी.
Leave a Reply