
तांदळाची खीर
साहित्य :
पाव वाटी तांदूळ
साखर अर्धी ते पाऊण वाटी
पाच-सहा वेलदोडे अगर अर्धे जायफळ
पाच-सहा बदाम
एक लिटर दूध
तूप
कृती :
तांदूळ तुपावर तांबूस होईपर्यंत भाजावे.
नंतर ते एक ते दोन तास थोड्या दुधात भिजत ठेवावे.
नंतर ते पाट्यावर रवाळ असे वाटावे.
उरलेले दूध उकळत ठेवावे.
दुधाला उकळी आल्यावर वाटलेले तांदूळ त्या दुधाला लावावे.
गोळी होऊ देऊ नये.
चांगले शिजल्यावर त्यात वेलची-पूड घालावी अगर पाव जायफळ उगाळून लावावे
बदामाचे काप करून घालावेत, दूध थोडे आटवून घेतल्यास खीर जास्त चांगली लागेल.
Leave a Reply