
तांदळाचे पापड
साहित्य :
दोन वाट्या तांदूळ
एक चमचा हिंगाची पूड
दोन चमचे मीठ
एक चमचा जिरे
एक चमचा पापडखार
ओल्या मिरच्या वाटून किंवा लाल तिखट
पाव वाटी तीळ
कृती :
तांदूळ पांढरे स्वच्छ घ्यावे. ते धुऊन, वाळवून त्यांचे दळून पीठ करावे.
जितके पीठ, तितकेच पाण्याचे आधण ठेवून त्यात मीठ, हिंग, जिरे, पापडखार व तीळ घालावे.
ह्या पापडाला तिखट घातले नाही, तरी चालते. घालावयाचे असल्यास ओल्या मिरच्या वाटून अगर लाल तिखट वरील आधणात घालावे.
पाण्याला उकळी आल्यावर तांदळाचे पीठ त्यात घालून, चांगले ढवळून, मंद विस्तवावर चांगले शिजवून घ्यावे.
गोळी होऊ देऊ नये. गरम असतानाच थोडे थोडे पीठ घेऊन, तुपाचा अगर तेलाचा हात लावून पापड लाटावे.
हे पीठ एकदम तयार करून घेऊ नये.
अन्यथा त्याचा चिकटपणा कमी होतो.
Leave a Reply