
सुजी हलवा ( रव्याचा शिरा )
साहित्य :
जाडसर रवा एक वाटी
साखर एक वाटी
तूप एक वाटी
तुकडे केलेले काजू अर्धी वाटी व थोडे बदाम
पाच वेलदोड्यांची पूड.
कृती:
साखर तीन वाट्या पाण्यात घालून ते पाणी उकळायला ठेवावं.
साखर विरघळून उकळी आली की उतरवून बाजूला ठेवावं.
कढईत तूप घालावं, ते मंद आचेवर विरघळलं की रवा घालून बेताच्या आचेवर परतत राहावं.
रवा नीट भाजला गेला की छान वास येईल व रंग किंचित बदलेल.
मग साखरेचं गरम पाणी रव्यावर ओतून, चांगलं ढवळावं.
वेलदोडा पूडही घालावी. तूप सुटू लागेपर्यंत मंद आचेवर परतत राहावं.
वाढायच्या भांड्यात काढून वरून काजू-बदाम-बेदाणे घालावेत.
गरमगरम वाढावा.
Leave a Reply