फरसबी (श्रावण घेवडा) भाजी

Sharavan-ghevada-recipe-marathi

Sharavan-ghevada-recipe-marathi

फरसबी (श्रावण घेवडा) भाजी

साहित्य :

अर्धा किलो फरसबी

चार-पाच ओल्या मिरच्या

मीठ

कोथिंबीर

ओले खोबरे

फोडणीचे साहित्य

कृती :

फरसबीच्या शेंगा नीट करून, धुऊन घेऊन, त्या बारीक चिराव्यात.

हळद न घालता फोडणी करावी व त्यात चिरलेली भाजी घालून चांगली वाफ आणावी.

वाटल्यास थोडे पाणी घालावे. भाजी चांगली शिजल्यावर वाटून घेतलेली मिरची व चवीप्रमाणे मीठ घालावे.

एक वाफ देऊन वर कोथिंबीर व खोबरे घालावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.