शहाजहानी मटण बिर्याणी

shahjahani-mutton-biryani-marathi-recipe

shahjahani-mutton-biryani-marathi-recipe

शहाजहानी मटण बिर्याणी

साहित्य :

तीन वाट्या बासमती तांदूळ

अर्धा किलो मटण

एक वाटी दही

एक वाटी तळलेला कांदा

सहा सुक्या मिरच्या

एक मोठा चमचा आलं-लसूण वाटण

एक चमचा गरम मसाला

एक चमचा हळद

मीठ

एक वाटी तूप

पाव चमचा केशर दुधात भिजवून

काजू- बदामाचे काप चारोळी आणि बेदाणे- प्रत्येकी पाव वाटी

आठ-दहा बारीक चिरलेले जर्दाळू

फोडणीसाठी

एक चमचा शहाजिरं

तीन दालचिनी

सहा हिरवे वेलदोडे

आठ-दहा लवंगा

दहा-बारा काळी मिरी

कृती :

तांदूळ धुऊन निथळावे. तळलेला कांदा, मिरच्या एकत्र वाटून ती वाटण आलं-लसूण वाटण, हळद, मीठ, गरम मसाला एकत्र करून दह्यात कालवावं.

मटण स्वच्छ धुऊन त्याला हे दही लावून अर्धा तास मुरू द्यावं.

पाव वाटी तुपावर अख्खा मसाला फोडणीला घालून नेहमीप्रमाणे मोकळा भात शिजवावा.

थोड्या तुपावर मटण परतून शिजवावं. सगळा सुकामेवा तळून घ्यावा.

जाड बुडाच्या भांड्यात तळाशी तूप घालून त्यावर मटण पसरावं.

त्यावर भात, सुकामेवा पसरून मध्ये मध्ये भोकं पाडून त्यात केशर तूप घालावं आणि भांडं कणकेनं बंद करून वाफ येऊ द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.