सरसों दा साग

sarso-da-saag-marathi-recipe

सरसों दा साग

साहित्य :

सरसोंच्या दोन जुड्या

पालकाची एक जुडी

शेपूची अर्धी जुडी

सलगम एक

टोमॅटो दोन मोठे

कांदे दोन मध्यम आकाराचे

हिरव्या मिरच्या दोन

आलं एक इंच

लसणीच्या पाकळ्या दहा-बारा

मक्याचं पीठ सहा चमचे

तूप चार चमचे

तिखट अर्धा चमचा

मीठ

जिरे एक चमचा

हिंग चिमूटभर

लोणी दोन चमचे

कृती :

तीनही पालेभाज्यांची पानं खुड चिरून घ्यावीत.

चिरलेल्या भाज्या, सलगम, कांदे, टोमॅटो, मिरच्या, आलं-लसूण सर्व चिरून कुकरमध्ये घालावं.

प्रेशर येऊन एक शिट्टी वाजली की मंद आचेवर सात मिनिटं भाजी शिजू द्यावी. शिजल्यावर घोटून घ्यावी.

मंद आचेवर झाकण न ठेवता शिजू द्यावी. मक्याच्या पीठात आधी मीठ घालून, मग ते भाजीला पेरून लावावं.

तूप गरम करून हिंग, जिरं व तिखट घालून हा तडका भाजीवर ओतावा.

वरून लोणी घालावं. मक्याच्या रोटी बरोबर गरम वाढावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.