सामोसा

samosa-recipe-marathi

सामोसा

पारीसाठी साहित्य :

अडीच वाट्या मैदा, सहा-सात चमचे तेल, चिमूटभर मीठ.

सारणासाठी:

दोन चमचे तेल

बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी

उकडून-सोलून कुस्करून घेतलेले बटाटे एक वाटी

उकडून घेतलेले मटार अर्धी वाटी

अर्धा चमचा हिरवी मिरची वाटण

अर्धा चमचा आलं वाटण

चवीपुरती साखर

मीठ

लिंबाचा रस दोन चमचे

थोडी चिरलेली कोथिंबीर

तळण्यासाठी तेल.

कृती:

तेल, मीठ आणि पाणी घालून मैदा चांगला मळून घ्यावा.

त्याचे सारख्या आकाराचे सहा गोळे करून ते लंबगोल लाटून घ्यावेत.

सारण तयार करण्यासाठी कढईत दोन चमचे तेल गरम करावं, त्यावर कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा.

कोथिंबीर वगळता सारणासाठीचे बाकी सगळे जिन्नस त्यावर घालून नीट हलवून एकत्र करावे.

झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं शिजू द्यावं. खाली उतरवून कोथिंबीर घालावी. नीट हलवून गार करत ठेवावं.

निवल्यावर सारणाचे बारा सारखे भाग करावेत.

लावून ठेवलेल्या लंबगोल पुण्याच्या मधोमध सुरीनं कापून प्रत्येकी दोन भाग करून घ्यावेत.

प्रत्येक भागाचा कोन तयार करून त्यात सारण भरावं आणि पाण्याचा हात लावून कडा चिकटवून बंद कराव्या.

याप्रमाणे सगळे सामोसे झाल्यावर गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

जास्तीचं तेल टिपलं जाण्यासाठी कागदावर काढून ठेवावेत.

आवडीनुसार चिंच गुळाची चटणी अथवा पुदिना चटणी सोबत द्यावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.