
सफेद पुलाव
साहित्य :
दोन वाट्या बासमती तांदूळ
पनीरचे चौकोनी तुकडे एक वाटी
एक वाटी फ्लॉवरचे लहान तुरे
एक वाटी मटारचे दाणे
अर्धी वाटी काजू-बेदाणे
अर्धी वाटी फेटलेलं दही
एक चमचा आलं-लसूण वाटण
एक वाटी उभा चिरलेला कांदा
अर्धी वाटी तूप
अर्धा चमचा लवंग, मिरी, शहाजिरं
दोन इंच दालचिनी
दोन तमालपत्रं
चार-पाच ठेचलेले वेलदोडे
मीठ
कृती :
तांदूळ अर्धा तास आधी धुऊन निथळावे.
चार वाट्या पाणी उकळावं.
जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून मटारचे दाणे, फ्लॉवर आणि पनीरचे तुकडे तळून घेऊन बाजूला ठेवावे.
उरलेल्या तुपात सगळा गरम मसाला फोडणीला घालून, कांदा आणि आलं-लसूण परतावं.
त्यावर तांदूळ परतून मीठ आणि पाणी घालून पुलाव शिजू द्यावा.
भात शिजला की त्यात फेटलेलं दही आणि जरुर असल्यासं थोडं उकळतं पाणी घालून तळापासून ढवळावा.
फ्लॉवर, पनीर, काजू-बेदाणे घालून मंद आचेवर वाफ येऊ द्यावी.
दही घातल्यावर भात तळाशी करपण्याची शक्यता असते म्हणून भांड्याखाली तवा ठेवावा.
Leave a Reply