
साबुत मुंगदाल
साहित्य :
आख्खे मूग एक वाटी,
आलं एक इंच
मीठ
हळद अर्धा चमचा
तिखट एक चमचा
हिरवी मिरची एक
लोणी एक चमचा
तेल तीन चमचे
हिंग चिमूटभर
जिरे एक चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
टोमॅटो दोन मोठे
कांदा एक मोठा
कोथिंबीर
कृती:
कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवावेत.
मूग स्वच्छ धुऊन तीन वाट्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावेत.
मग कुकरमध्ये घालून त्यात मीठ, आलं, चिरलेली हिरवी मिरची व हळद घालून शिजत ठेवावे.
एक शिट्टी झाल्यावर मंद आचेवर पाच सात मिनिटं शिजू द्यावे.
शिजल्यावर फार घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालून दहा मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावे.
तेल गरम करून हिंग, जिरे घालावं. चिरलेला कांदा घालून तांबूस लाल परतावा. मग टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतावं.
तिखट व गरम मसाला घालावा. मग हा तडका डाळीत घालून वाढायच्या भांड्यात डाळ काढावी. लोणी व थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी.
भात किंवा पोळी दोन्हीबरोबर छान लागते आणि उरली तर त्यात मावेल तेवढी कणीक घालून पराठेही छान होतात.
Leave a Reply