राजमा

rajma-recipe-marathi

rajma-recipe-marathi

राजमा

साहित्य:

राजमा दोन वाट्या

कांदे दोन

टोमॅटो दोन

आलं-लसूण वाटण दोन चमचे

हिरव्या मिरच्या दोन

राजमा मसाला दोन चमचे

मीठ

तिखट अर्धा चमचा

तेल सहा चमचे

जिरे एक चमचा

चिमूटभर हिंग

अर्धा इंच दालचिनी

एक तमालपत्र

कृती :

राजमा धुऊन पाच तास भिजत घालावा.

कांदे व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.

भिजलेला राजमा थेट कुकरमध्ये घालून ठेवावा.

तडका करण्यासाठी तेल गरम करून त्यात हिंग, जिरं घालावे.

मग कांदा घालून तांबूस लाल परतावा, आलं-लसूण वाटण घालावं, मग टोमॅटो घालून परतावे.

राजमा मसाला, तिखट, दालचिनी, तमालपत्र घालावं.

राजमावर तडका घालून मीठ व चार-पाच वाट्या पाणी घालावं कुकरमध्ये शिजवून घ्यावा.

राजमा नेहमी गरम भात व पापड यांच्याबरोबर खातात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.