
पंजाबी राजमा चावल
साहित्य:
दोन वाट्या बासमती तांदूळ
एक वाटी राजमा
एक वाटी चिरलेला टोमॅटो
एक वाटी उभा चिरलेला कांदा
तिखट
मीठ
अर्धा चमचा गरम मसाला
एक चमचा आलं-लसूण वाटण
एक मोठा चमचा धने जिऱ्याची पूड
अर्धी वाटी तूप
दोन तमालपत्र
दोन-तीन बडी वेलची
पाच-सहा लवंगा
दोन इंच दालचिनी
आठ-दहा काळी मिरी
हिंग
हळद
चिरलेली कोथिंबीर
कृती:
आदल्या रात्री राजमा भिजत घालून सकाळी थोड्या मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यावा.
तांदूळ धुऊन निथळावे. जाड बुडाच्या भांड्यात पाव वाटी तूप तापवून त्यात अख्खा मसाला फोडणीला घालून त्यावर तांदूळ परतावा.
दुप्पट पाणी घालून भात मोकळा शिजवावा.
दरम्यान दुसऱ्या भांड्यात उरलेलं तूप तापवून त्यावर कांदा, आलं-लसूण वाटण, टोमॅटो, गरम मसाला, धनेजिरं पूड आणि मीठ घालून राजमा घालावा.
हा मसाला एक-दोन मिनिटं परतून साधारण सुका करून भातात मिसळावा आणि चांगली वाफ आणावी.
Leave a Reply