
पंजाबी भूना चावल
साहित्य :
दोन वाट्या बासमती तांदूळ
एक वाटी उभा चिरलेला कांदा
तूप
पाव वाटी तळलेले काजू- बेदाणे
एक चमचा कच्चा मसाला
मीठ
तूप
लवंग
मिरी
दालचिनी
कृती :
तांदूळ धुऊन निथळावे.
तुपात कांदा चुरचुरीत तळून घ्यावा आणि बाजूला ठेवावा.
उरलेल्या तुपात थोडी लवंग, मिरी, दालचिनी फोडणीला घालून तांदूळ परतावे.
मीठ, कच्चा मसाला आणि उकळतं पाणी घालून भात शिजवावा.
काजू, बेदाणे आणि कांदा मिसळून चिकन, मटण इत्यादी मांसाहारी पदार्थांबरोबर वाढावा.
Leave a Reply