
पुदीना राईस
साहित्य :
एक वाटी बासमती तांदूळ
एक वाटी पुदीन्याचा रस
एक टेबलस्पून साखर चवीसाठी
एक टी स्पून आल्याचा कीस
वर घालण्यासाठी ओलं खोबरं व कोथिंबीर
दोन पाकळ्या लसूण बारीक ठेचून
एक टी स्पून काळा मसाला
तेल एक डावभर व फोडणीसाठी मोहरी
हळद व हिंग
जिरं एक चमचा
सात-आठ कढीपत्त्याची पानं
दोन मिरच्या अगदी बारीक चिरून
मीठ
कृती :
प्रथम तांदूळ धुवून निथळावेत. नंतर फोडणी करून चांगले परतावे.
नंतर त्यात पुदीन्याचा रस घालून ढवळावं, दोन भांडी पाणी घालून पुन्हा ढवळावं.
त्यात मीठ, साखर, मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पानं, आल्याचा कीस, लसूण वाटण घालून चांगलं ढवळून घ्यावं
त्यात काळा मसाला घालून ढवळून घ्यावं. नंतर प्रेशर कुकरमध्ये नेहमीसारखे भांडं ठेवून दोन शिट्या आणाव्यात.
अर्ध्या तासानं भात काढून एका ताटलीत मुदी पाडून त्यावर खोबरं, कोथिंबीर घालून खायला द्यावा.
Leave a Reply