
पुदिना चटणी
साहित्य:
पुदिना एक गड्डी
कोथिंबीर एक वाटी
कैरी एक
हिरव्या मिरच्या दोन तीन
कांदा एक
गरम मसाला एक चमचा
साखर अर्धा चमचा
मीठ
कृती :
कोथिंबीर ची पानं, पुदिन्याची पानं, मिरची चिरून घ्यावं.
कांदा-कैरीही चिरून घ्यावं.
सर्व साहित्य एकत्र करून चटणी वाटून घ्यावी.
कैरीऐवजी लहान लिंबाएवढी चिंच वापरता येते.
चिंचेचा कोळ वापरल्यास चटणी बारीक झाल्यावर त्यात कोळ घालून पुन्हा एकदा चटणी मिक्सरमधून फिरवून घ्यावी.
Leave a Reply