
पोह्यांचे पापड
साहित्य :
एक किलो जाड पोहे
मीठ
लाल तिखट
३० ग्रॅम पापडखार (भाजलेला)
२५ ग्रॅम हिंग
कृती :
पोहे किंचित भाजून, दळून घ्यावेत. त्यातील थोडे पीठ पापड लाटण्याकरिता ठेवून द्यावे.
बाकीच्या पिठाइतकेच पाणी घेऊन, त्या पाण्यात अंदाजाने मीठ, तिखट, पापडखार व हिंग घालावा.
पाण्याला उकळी आणावी व खाली उतरवून ठेवावे.
नंतर त्यातील एक भांडे पाणी घेऊन, एक भांडे पोह्याचे पीठ घ्यावे व दोन्ही मळून गोळा करून घ्यावा
तो गोळा उखळात मुसळाने चांगला कुटावा व लहान गोळ्या करून, त्यांचे पातळ पापड पोह्याच्या पिठावर लाटावे.
तो गोळा संपल्यावर पुन्हा तसेच पाणी व पीठ घेऊन गोळा तयार करून घ्यावा.
सगळे पाणी व सगळे पीठ कधीच एकदम मिसळून तयार करू नये.
कारण त्यामुळे काही वेळ गेल्यावर त्याचा चिकटपणा कमी होतो.
Leave a Reply