
पारशी बिर्याणी (लगन-नु-बिर्याणी)
साहित्य :
तीन वाट्या बासमती तांदूळ
पाऊण किलो मटण
पंधरा- वीस लसूण पाकळ्या
दीड इंच आलं
चार-पाच हिरव्या मिरच्या
दोन चमचा जिरं
अर्धी वाटी कोथिंबीर
अर्धी वाटी पुदिना
एक मोठा चमचा खसखस
अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं
एक चमचा गरम मसाला
एक चमचा तिखट
एक वाटी दही
पाव चमचा केशर
एक वाटी वाळवलेला कांदा
एक वाटी तूप
मीठ
चांदीचा वर्ख
दोन वाट्या तळलेल्या बटाट्याच्या चिप्स
अर्धी वाटी काजू-बेदाणे
एक वाटी चिरलेला कांदा
कृती :
तांदूळ स्वच्छ धुऊन चार वाट्या कोमट पाण्यात अर्धा तास भिजत घालावे.
मटण स्वच्छ धुऊन त्याला हळद-मीठ लावून ठेवाव. खसखस, खोबरं भाजून घ्यावं आणि बारीक वाटावं.
आलं, लसूण, जिर, मिरच्या, कोथिंबीर, पुदिना एकत्र वाटून दह्यात मिसळून ते दही मटणाला लावून मुरू द्यावं.
अर्धी वाटी तूप तापवून त्यात काजू-बेदाणे, कांदा तळून बाजूला ठेवावा. लागल्यास थोडं तूप घालून त्यात चिरलेला कांदा परतावा.
त्यावर तिखट, गरम मसाला आणि मटण परतून जरूरीनुसार थोडं पाणी घालून अर्धवट शिजवावं.
नंतर खसखस, खोबऱ्याचं वाटण आणि भिजत घातलेले तांदूळ, मीठ घालून उरलेल तूप, केशर घालावं.
सगळ्यात वर कांदा, काजू-बेदाणे पसरावे आणि घट्ट बसणारं झाकण ठेवून कणकेनं बंद करावं.
तयार झालेली बिर्याणी नेहमीच्या पद्धतीनं मंद आचेवर शिजवावी. वाढताना वर चांदीचा वर्ख लावावा.
मटणाच्या रसात भात शिजल्यानं ही बिर्याणी चवीला वेगळी लागते.
Leave a Reply