
पनीर मशरूम पुलाव
साहित्य :
दोन वाट्या बासमती तांदूळ
दोनशे ग्रॅम बटण मशरुम्स
दोनशे ग्रॅम पनीर
एक वाटी उभा चिरलेला कांदा
अर्धी वाटी काजू बेदाणे
अर्धी वाटी तूप
फोडणीसाठी
लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरं, तमालपत्र, मीठ, मिरपूड, पाव चमचा आलं-लसूण वाटण, अर्धा चमचा कच्चा मसाला, लोणी.
कृती :
तांदूळ धुऊन निथळावे. चार वाट्या पाणी उकळून ठेवावं.
पनीर चौकोनी चिरावं. मशरुम्सचे प्रत्येकी चार तुकडे करावे जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून पनीर तळून घ्यावं.
नंतर त्याच तुपात कांदा तळून घ्यावा.
काजू-बेदाणेही तळून घ्यावे.
उरलेल्या तुपात आख्खा मसाला आणि आलं.
लसूण वाटण परतून त्यावर तांदूळ परतावे.
चवीनुसार मीठ, कच्चा मसाला, उकळतं पाणी घालून शिजू द्यावा.
दुसऱ्या भांड्यात थोडं लोणी गरम करून त्यात मशरुम परतावे.
मीठ मिरपूड घालून त्यांना पाणी सुटलं की ते मशरुम आणि पनीर शिजत आलेल्या भातात मिसळावं.
तळलेला कांदा, काजू-बेदाण्यानं सजवावा.
Leave a Reply